बा_रायगड

This slideshow requires JavaScript.

Advertisements

#बा_रायगड 🚩 🚩

raigad sid editographyff-01
शिवस्वर्ग शिवतिर्थ रायगड

 रायगड दर्शन २

 

रायगड फिरायचा म्हणजे चालताना प्रत्येक पाऊल आगदी मोजत टाकावा कारण कधी पायाखाली इतिहासच पान येईल कळणार नाही…

रायगड फिरणारे कैक असतात पण ज्याचा नजरेत पारखण्याची कूवत असते त्या येड्याचा च पायाखाली तोफेचा गोळा येतो.. कोणाला कोणत्या तरी टेपाडावर हनुमान दिसतो आणि कोण आपल्या बैठ्या खोलीत कामकादातुन वेळ काढुन हाजारो मैलाचा अंतरावरून रायगड स्पष्ट पाहु शकतो पण आम्ह भाबड्याना आजुन तो निटसा दिसला नाही. आम्ही रायगड बघायला मान उंच केली की सुर्या मुळ डोळ्यात पाणी येतो पण त्या सुर्यात झळकलेला रायगडचा प्रत्येक कडा हा असाच का खडा ते दिसत नाही. रायगडावर एवढे दिवस जगलो प्रत्येक दिवस त्या तटबंदी वर फिरून आखेर तीच्या आडोश्याला बसायचो…  जणु त्या तटबंदी चा एक अविभाज्य घटक. बसुन बसुन विचार करायचो की खरच जर ह्या तटबंदी चा मी एक दगड झालो तर त्या राजाचा पाय एकदा तरी मला लागल…

राज गनिम अस म्हणत बुरजावर उबा असलेला मावळा आपल्या कोफणित मला घेईल आणि हा असा भिरभिरत माझ्या तोर्यात मी त्या गनिमावर तुटुन पडीन…  आणि ह्या गनिमीकाव्याला बळी पडुन बुडाला पाय लावुन चार कोस लांब पळणार्या त्या शञुची आपल्या मुळे पळताभुई थोडी झाली ह्या हुन आधीक समाधान ते काय..

DSC00544-01
महादरवाजा शिवतिर्थ रायगड

मौसमी पावसाची सुरवात आणि पहिला पाऊस अनुभवला रायगडावर..  दातखीळ्य बसवणारी थंडी आणि पावसाची रिमझिम त्या मुळे सगळी कडे नुसता चिखल दिवस भरभर निघुन जायचा पण राञी जेव्हा शिवतिर्थाला जाग यायची तेव्हा त्याचा सोबत बोलत आगदी एकांत रायगड आपले गूढ सांगतो…

एका राञी असाच राजसदरेवरच काम आटपुण नगारखाण्याचा बाहेर ध्वजापाशी येउन बसलो सुसाट वाहणारा वारा त्या ध्वजदंडाला लावलेली साखळी सुध्दा आपल्या सोबत उडवत होता त्या मुळ आसमंतात त्या साखळीचा आवाज पुरता गुंजत होता मी समोरच बसलो होतो आणि प्रत्येक जण आप आपल्या बोलण्यात गुंग झाले मी एक दीर्घ श्वास घेत रायगडाची थंड हवा छातीत भरली आणि त्या लाल मातीत उपडी झालो आणि डोक्यात विचार करू लागलो त्या राज्याभिषेक सोहळ्याचा काय असेल तो क्षण भल्या पहाटे नगारखाण्यात नाचणारे नगारे..  सनईच्या साथिला वाजणारे चौघडे..  समोर आसमंतात माज करत सर्व शञु यवनांच्या मानगुटीवर बसुन फडकणार भगवा…

सदरेवर दुतर्फा असलेले हत्ती जिकडे तिकडे उत्सव सजली मेघडंबरी सजला नगारखाणा, सजला शिवतिर्थ सजला प्रत्येक दगड आणि सजला ३२ मन सोण्याच सिंहासन..  सिंहासनावर जढवलेला प्रत्येक अनमोल रत्न चकाकत होता…  राज सदरेवर जमलेले पुरोहित आणि शंख नादात मंञोच्चरात पवित्र झालेली ती प्रत्येक वास्तु…  मंञोच्चारण सुरू झाले आणि हिरवा चुडा परीधान करुन आई शिर्काई आपल्या लेकराला मायेने सिंहासनावर बसवायला आली होती..

आसमंतात सज्ज झालेले देवदेवता आतुरतेने महाराजांना कृपाशिर्वाद द्यायला सज्ज झाले होते… राज्याभिषेका साठी आणलेल सप्त नद्यांच पाणी ओसंडत होत त्या राजा चा देह स्पर्श करण्यासाठी..

प्रत्येक क्षण लाख मेलाचा राज सभेत वाहणारा तो कारंजा जनु आभाळाला टेकायला निघाला हेता. जिकडे तिकडे सुंगंधी अत्तरांनी सारा आसमंत दरवळुन गेला होता आणि एवढ्यात नगारखाण्यात नगारे प्रखरतेने दुमदुमु लागले आणि आसमंत चिरत एक आरेळी गुंजली..

आस्ते कदम

आस्ते कदम

आस्ते कदम

महाराज, गडपती गजपती दुर्गपती, भूपती प्रजापती,सुवर्णरत्नंश्रीपती ,अष्टावधान जागृत ,अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडीत, शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत ,राजनीती धुरंधर, पौढप्रताप पुरंदर, क्षत्रीयकुलावतंस, सिंहासनाधिश्वर राजाधिराज, महाराज श्रीमंत पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..🙏🚩

Raje2-01
मेघडंबरी शिवतिर्थ रायगड

युगायुगांचे अंधार दुर करत स्वराज्याचा पायरीवर महाराजांचा सुवर्ण जडीत मोजडीतील तो पाय ते तेज, तो रूबाब, सगळी कडे शिवाजी नावाचा गजर शिवरायांचा सोबत चालणार्या माॅं साहेब…  महाराज सिंहासनावर आरूढ व्हायला सज्ज होते.. इतक्यात बाजुच्या दोस्तान हाक मारीत मला भानावर आनल घड्याळात बघितल तर राञीचे २ वाजता मी सदरेवर लोळत होतो…  थोडा वेळ निप्चित पडुन राहीलो मनोमन त्या राजाला तीन हात झुकुन मुजरा केला…  आणि त्याचा नावान गजर करत मी माझ्या राजवाड्या कड गेलो….

बा रायगड खरच एक मायाजाल आहे… 🚩🙏

 

 

 

-उनाड… 👣💭 (सिध्देश भाई सुर्वे)

८०८७३३३६७८

💝 Celebrating 4 years of love 💝

अमु..

 

अग ये इकडे बस.. आज ११ तारीख म्हणे..! आठवतय का काही? ११ डिसेंबर २०१३.. नाही??? ११/१२/१३ आठवल?
बघ मागे वळुन जरा.. ४ वर्ष झाली आपल्या प्रवासाला.. प्रेमाच्या गाडीत बसुन इथवर कधी आलो कळालच नाही गं..
बघता बघता ४ वर्ष उलटली, पण आपला प्रवास माञ सुखद आणि सूखकर सुरु आहे.. कित्येक आठवणींचे बोचके भरुन ह्या प्रवासाला निघाले होतो, आज ४ वर्षाने इथं पोहचलोय.. आजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे.. प्रवासाला निघालो तेव्हा पुसटशी सुध्दा कल्पना नव्हती की हे सगळ अस होणार आहे.. पण ही शर्थी ची ४ वर्ष आज अभिमानाने मिरवावी अशी..

तु दिलेल्या क्षणांनी
आयुष्याचे सोणे झाले
तुझ्या त्या एका मुक्या नजरेने
माझे तुझ्या कडे येणे झाले

४ वर्षा आधी सुध्दा तेच विचारल होत आज ही तेच विचारतो.. तुझ्या आयुष्याच्या गोदामात माझ्या आठवणींना एखादा कोपरा मिळेल का..
मी दुसर्‍या कोणाकडे पाहिल्यावर सांग तुझा जिव जळेल का..? 😉

मेरे दिल के मुसाफिर ४ साल का सफर मुबारक हो..

४ वर्ष उम्मेदीची
४ वर्ष प्रेमाची
४ वर्ष शर्थी ची
४ वर्ष तुझ्या माझ्या पिरती ची..

 

पुन्हा एकदा,
तुझा #उनाड.. 👣 💭

 

तिचा वाढदिवस.. ✨🍫🎂

                आज स्वप्नांना जाग आली म्हणून हळुच क्षितिज पार करुन ह्या समुद्राच्या न दिसणार्या किनार्या वर येवुन बसलो.. म्हटल उगवणार्या चंद्राला आणि मावळणार्या सुर्याला बघुन थोडस काही सुचतय का ते बघाव.. अथांग पसरलेल्या सागरावर झेप घेणारे पक्षी, लाटांचा सळसळणारा आवाज आणि तुझ माझ आपल नाव त्या समुद्र किनार्या च्या वाळुत कोरत मी मातीचे किल्ले बांधत होतो.. कुतुहलाने तुझ नाव माझ्या नावा सहित त्या रेतीत लिहील आणि एक पान वहीच हातात घेवुन तुझ्यावर ४ ओळी लिहायला बसलो.. समोर पसरलेला अथांग सागर, खळखळणार पाणी, किनार्या वर आपटणार्या लाटा आणि मी जिथे बसलोय तिथे पायाच्या अंगठ्याने केलेला छोटासा खळगा त्या खळग्यात जमा झालेल पाणी, आणि त्या निळ्याशार डोहात सागराला आणि आभाळाला एकाच वेळी पाहीलेल मी.. माझ्या भोवतीचा तुझ्या आठवणींचा पसारा आणि तुला आठवुण काळजाच्या काजळीने लिहीलेल्या काही ओळी.. समुद्र म्हटला की सौमित्र आठवतात..

माझ्यासोबत समुद्राच्या
खर्या-खोट्या बाता येतील
मला शोधत जाल तेंव्हा
अनेक वळण वाटा येतील
मी जसा आहे तसा
Please पाहू नका मला
माझा फोटोच काढाल तर
त्यात फक्त लाटा येतील

त्यांच्या ओळी गुणगुणत तुझ्या वर लिहीलेली कविता

ती
ती अशीच आहे सारखच काहीना काही करणारी..
राञी मध्येच मेसेज करुन ढगात गुंतलेल्या चंद्र कोरी कडे बघ म्हणत आमच्या नात्याची साक्ष देणारी..
अजुनही जुणी गाणी ऐकणारी..
सारखी मला ञास देणारी..
राञी मध्येच उठ म्हणत मला तुझ्या खांद्यावर डोक ठेवुन बसायच आहे म्हणनारी..
ती अशीच आहे एस टी त बसल्यावर हाथ घट्ट पकडुन धरणारी, कानात वाजणार्या प्रत्येक गाण्याची lyrics फिल करुन मध्ये च नाजुकस हसणारी
ती अशीच आहे एकदा गेली की लवकर न येणारी, पण आली की सिद मला नाही जावस वाटत म्हणत राञी मला भेटायला येणारी
ती अशीच आहे आकाशाला पाण्यात बघुन त्यात पाय बुडवुन बसणारी
ती अशीच आहे सदा हसरी असणारी
ती अशीच आहे melted silk सारखी हातावर घेतली की पटकण विरघळणीरी..
माझी अमु
ती खरच अशीच आहे..
प्रेम काय असत, एखाद्या ची आठवण आली की आपोआप डोळ्यांच्या कडा भरुन येण की कोणीतरी लांब आसुन सुध्दा तीथुन आपल्याला जवळ करण, राञभर आठवणीत जागण की फक्त एक लव यु बोलुन निश्चिंत झोपण, दिवस राञ झुरण की एकमेकांच्या आठवणीत खेळण..
काय असत प्रेम..?

ही गोष्ट तेव्हाची जेव्हा मी माझा होतो.. तिच्या मागे फिरायचो तेव्हा एकदम ताजा होतो, शाळेच्या ड्रेस मध्ये तीला जेव्हा पहिल्यांदा पाहील तेव्हा ती लाजरी जराशी गोजरी आखीव रेखीव आणि भन्नाट होती.. मान खाली करुन चालन एका हातात सायकल आणि आपल्या गळ्या भोवतीची ओढणी सांभाळत ती समोरुन आली मी बावरलो नेहमी प्रमाणे तीचे पानेरी डोळे जमीन मोजत चालत होते, एवढ्यात तिची नजर वर झाली आणि थेट माझ्या वर येवुन आदळली तोच घाव एवढा खोल बसला की आज ४ वर्षा नंतर सुध्दा ती जखम भरली नाही.. तीला रोज चोरुन लपुन बघण हेच त्या वरच औषध होत..
ते दिवस आठवले की रमुन जायला होत समुद्र किनारी बसुन दुरुनच लाटा पाहण्या सारख त्या दिवसात तुझ्या शिवाय जागून काढलेल्या राती आज आठवल्या कि भरल्या डोळ्यांनी चेहर्यावर हसु येत.. भर उन्हात पाउस बरसावा अस मी तेव्हा माझा होतो मनातल अस लिहायचो आणि लिहीलेल्या पानांच्या होड्या करुन पाण्यात सोडायचो, पान भिजल की शाई पसरायची लिहीलेले शब्द पसरायचे आणि प्रकर्शाने दिसायचे पाण्यात होडी करुन सोडलेला तो प्रत्येक पान तुझ्या सहवासाचा किनारा शोधत वाहत होता.. मी नवखा होतो हा प्रवास नवा होता, किनारा अनोळखी, जीर्ण झालेल ते पान बुडत होत पण तु किनारा दिलास आपल्या प्रेमाची ती नाव आज ही शर्तीने प्रवास करते आहे.. ह्या प्रवासात तु दिलेली साथ आयुष्य भर अशीच राहू दे.. आज आपल्या नात्याची एक नवी पालवी फुटली.. आज तुझा वाढदिवस तुला काहीतरी विलक्षण भेट घ्यावी हे सारखच वाटत असत पण जन्मदिनी तुला आयुष्य कधी ही न मिळालेली भेट देण्याचा अट्टहास नेहमी असतो त्या सारखाच हा५एक दिवस happy birthday to you AMRUTA
तु मला बोलत केलस, प्रेमाच्या दुनियेत चालत केलस, तुझ्या मुळे लिहीता आल लिहीलेल जगा पुढे मांडता आल.. तुझ्या सोबत चा प्रत्येक क्षण खुप विलक्षण होता आज त्या क्षणांकडे मागे वळुण बघताना डोळ्यांचा कडा पाण्यानी जड होतात.. एवढी वर्ष तुझ्या शिवाय काढली अन अचानक तु आयुष्यात येतेस काय त्या नंतरचा थेट हा दिवस तु लहान होतीस शाळेत असताना जेव्हा पहील प्रेम तुझ्यावर झाल.. शाळेतल्या दिवसातल प्रेम.. ज्या वयात हाफ पेंट घालुन शाळेत जायचो तेव्हा पासुन तुझ्यावर अविरत प्रेम करत आलोय.. तुला जेव्हा शाळेत बघायचो तेव्हा तो शाळेचा ड्रेस आणि त्या लाल रिबीनीने बांधलेल्या दोन वेण्या आणि चुणचुणीत तुझी सावली डोळ्या समोर येते, ज्या वेळी धड मराठी स्पष्ट बोलता येत नव्हती त्या वयात प्रेमाची भाषा शिकवणारी तु आज पर्यंतर खुप काही शिकवल आहेस मला.. तेव्हा खुप आकर्षण होत तुझ्या बद्दल च.. लहान मुलाला असत ना चॉकलेट च अगदी तसच.. चॉकलेट च कागद उघडाव आणि त्याचा आत एक स्टिकर सापडाव ते स्टिकर हातावर चिटकवुन गावभर बोंबा मारत फिराव अस प्रत्येक वेळी वाटायचं तुला पाहिल्यावर आज ही वाट.. जेव्हा मी तुझा होतो पण तुला पुसटशी शुध्दा कल्पना नव्हती आपल्या नात्याची तेव्हा तुझ्या आठवणीत काढलेल्या राञी.. शब्दांचा दुनियेत चंद्राला जवळ करुन तु लांब असल्याच केलेल वर्णन आणि तु माझी कधीच होवु शकणार नाहीस अस अरेरावी ने मला सांगणारे कित्येक जण त्या दिवसात भेटले मी तुझ्या वर जिवापाड प्रेम करतो हे माहीत असुन सुध्दा माझ्या समोर तु त्यांना ही अवडतेस अस सांगुन माझ्या जिवाची हेळसांड करणाऱ्या त्या प्रत्येकाचा हिशोब तयार आहे, त्या दिवसा नंतर आज वर जे घडल ते दिवस ते प्रत्येक क्षण किलो किलो ने मनाच्या गोदामात साठवुन ठेवले आहेत.. हॅलो सिध्देश.. तुझ्या आवाजाचा तो पहिला फोन कॉल आजही तेवढ्याच जोरात ऐकु येतो.. ११/१२/१३ ला तुझ्या प्रेमात उडी घेउन जीव दिला तेव्हा पासुन आज पर्यंतर फक्त स्वर्ग अनुभवला तुझ्यामुळे, तु मोठी आहेस माझ्या पेक्षा आणि आज आणखी एका वर्षाने मोठी झालीस.. तुझ बोलण मी तुला आपल्या नात्या साठी विचारल्या नंतर तुझा १० मिनिटांचा साइलेंस आणि तुला गमवल तर नाही ना ह्याची वाटलेली भिती, अंगावर उभा राहीलेला शहारा आणि सिध्देश आय लव यु टु म्हणत तु दिलेल उत्तर अंगात वाहणार्या रक्तप्रवाह जाणवायला लागला, ह्रदयाचे ठोके अचानक फास्ट झाले डोळ्यात आलेल पाणि हातावर पडल आणि अंगावर उठलेला शहारा नाहीसा झाला एवढी वर्ष फक्त स्वप्नात बघितलेल्या तुला वास्तवात आपलस करण खरच खुप बेभान अनुभव होता आज ११ तारीख तुझा वाढदिवस तुला उदंड आयुष्य, आणि जशी आज वर हसत आलियेस तशीच पुढचे सारे आयुष्य हसत खेळत रहावस एवढी प्रार्थना जिवाच्या पलिकडे जापणाऱ्या माझ्या मनाच्या पाखराला वाढदिवसाच्या हळव्या शुभेच्छा तुझ्या जन्मदिनी माझ उरल सुरलेल आयुष्य तुला भेट म्हणुन देतो.. आय लव यू मेरा बच्चा आय लव यु अमृता

– उनाड.. 👣

 

https://sidsurve0211.wordpress.com

👑 कोकण 👑

            आमच्या कोकणातला पाऊस ह्या सह्याद्रीचा खोर्यात बेभान होऊन बरसतो.. सह्याद्रीच्या सुळक्याना घासुन जाणारे धुके आणि धुक्यात हरवलेला तो सह्याद्रीचा प्रत्येक चिरेबंदी कडा.. आणि अश्या ह्या सह्याद्रीचा सावलीत वसलेल आमच कोकण..
कोकण म्हणजे साक्षात परशुरामाची भुमी, देवाच स्वर्ग म्हटल तरी अपरुप वाटु नये.. अशा ह्या पतित पावन भुमीवर रायगडाच्या छायेत महाड च्या ऐतिहासिक भुमित आपल जन्म म्हणजे मागच्या जन्मी केलेली लाखपटीची पुण्याई..

            माणस मेल्या नंतर स्वर्गाची वाट पाहतात आम्ही जिवंत पणी स्वर्ग पाहितो.. पावसाळ्यात कोकणात हिंडताना डोंगर माथ्यांवर समोरचा रस्ता सुध्दा दिसु नये एवढ धुक आणि आभाळावर बसुन विश्वाची सैर आस काहीस फिलिंग येत.. आजु बाजुच्या काथळावरुन जोर जोरात कोसळारे पांढरे शुभ्र धबधबे आणि ह्या सह्याद्रीने आंगावर परिधान केलेला हा हिरवा शालु एखाद्या चिञकाराने आपल्या जिवाच्या आकांतानी मनोहारी दृश्य रेखाटाव एवढ लावण्य ह्या सह्याद्रीच., माथ्यावर कोसळणार्या पावसाच्या धारा आणि आसमंतात भिरभिरणारा गार वारा आणि आश्या गार वार्यात अंगावर उठलेला काटा, शरीरावरची प्रत्येक लव (केस) टवकरून उभा राहील एवढा विलक्षण अनुभव ह्या आमच्या कोकणातल्या पावसाचा, कोणत्यातरी टपरी वर काकुंच्या हातची कांदा भजी आणि भर धुक्यात धुक्यावर धुक सोडणारा एक वाफळत्या चहाचा गरमा गरम कप ☕ ह्या पेक्षा जगात सुख ते काय..? बाजुच्या टपरीत निखार्यांवर नाचणारे सोणेरी कणिस आणि त्या कणसावर दाबुन फिरवलेला लिंबु तिखट मिठाचा लेप दाताच्या डफल्या वाजवणार्या थंडीत गरम गरम मका आणि कधी ही न संपणारी धुक्यात हरवलेली ही कोकणातली वाट.. 👣

         जगात लाखो गोष्टी भारी असतील पण माझ कोकण भन्नाट आहे.. मामा च गावाला धुरांच्या रेशा हवेत सोडत जी गाडी पहील्यांदा कोणत्या गावी आली असेल तर ते कोकण च होत..
कोकण माझ गाव..
खरच..
.
.

मी स्वर्गात राहतो.. 👣

#उनाड.. 👣 💭 (सिध्देश सुर्वे)
©reserved

प्रेम पत्र        

____________________________

सिध्देश सुर्वे
महाड रायगड,
४०२३०१.
दि. १४/२/१७

प्रिय बायको.,

प्रिय बायको पञ लिहिण्यास कारण की आजकाल फोन वर आणि मेसेज वर सरास बोल जात पण पञातुन आपल्या भावना समोरच्याला लिहुण कळवायच्या ह्यात वेगळीच गम्मत आहे, आपल्या मनात जे चाल्लय ते बेधडक लिहुण कोणत्याही उत्तराची आपेक्षा न धरता अगदी सडेतोड शब्दात समोरच्याला मनातली भावना पटवुन देण ह्या साठी पञा पेक्षा उत्तम साधन ते काय..?
मेसेज वर बोलताना किमान शब्दात कमाल बोलायला लागत मग काही शब्द राहुन जातात आणि शब्दांना चिकटलेल्या काही आठवणी आणि सोबतचे काही अविस्मरणीय क्षण शब्दात बांधायचे राहुन जातात.. मेसेज वर लिहीलेल्या गोष्टी आणि लगेच त्या वर मिळालेल उत्तर हे आजच्या 4G च्या जगात उत्तम आहेच पण आपल्या जवळच्या आणि जिवलग माणसाला पञ लिहुण त्या वर त्याचा उत्तराची वाट बघण्यात आणि झुरण्यात कमालीची उत्सुकता आहे..
आज हे पञ लिहीतोय त्या मागे मोठ अस कारण नाही बस आपल्या इवल्याशा नात्याची इत्तुशी आठवण तुझ्या साठी ह्या पञात बांधुन देत आहे..

कस आहे एखाद्या वेळी मरण्याची नक्कल करता येउ शकते पण जगण्याची नाही.. तसच जगायला काही कारण असेल तर नक्कल करायची गरज नाही आणि माझ्या जगण्याच एक कारण तु आहेस.. अस म्हणतात पाणि ओंजळीत थांबत मुठीतुन सांडत तसच आपल हे प्रेम ओंजळीत घेउन आयुष्यभरासाठी किंबहुना ७ जन्मांपर्यंतर तुझ्या तुला ञास देण्यासाठी तुझ्या आयुष्याला माझी पिडा लावायची आहे जी कीती ही देव देव केले तरी सुटु नये आणि अखंड ७ जन्म तुझ्या जवळ अविरत तुझा बनुन जगत राहो हिच ह्या जिवाची इच्छा.. तुझ्या प्रेमात पडल्या नंतरचा प्रत्येक दिवसच valentine day होता त्या साठी १४ फेब्रुवारी ची वाट मी कधीच पाहीली नाही ह्या पुढे ही असच सांभाळ कारण तो दिवस ही दुर नाही जेव्हा आपल्या हातात आपल्या लग्नाची दोर असेल..

१० वी नंतर पहिल्यांदा पञ लिहीतोय, जस जमल तस लिहीलय चुकभुल समजुन घे आणि पञाचं छोटस उत्तर दे. दोन ओळी तुझ्या साठी

एक क्षितिजा जवळचं गाव बघ
आपल्या दोघाना राहयला
किती मज्जा येईल नाही जगाकडे
थोडं अंतर ठेऊन पाहयला….         

तुझा
#उनाड.. 👣 💭

p_20160906_185234

सावित्री पूल

२ आॅगस्ट २०१६..

                      महाड वासीयांसाठी आयुष्याचा आठवणींन मध्ये कायमचा लक्षात राहील असा काळा कभिन्न दिवस..
आसमंतीचा सुर्य उदयाला आला तोच पावसाच्या आतिशबाजीत आषाढ़ वद्य आमावस्या असल्या मुळे राञं दिवस धो-धो पडणारा पाऊस त्या दिवशी आपल्या वेगळ्याच रूपात तुटुन पडला होता.. महाड नजिक असलेली जीवनदायिनी सावित्री नदी दुथडी भरुन वाहत होती… काही वेळातच पावसाचा जोर आणि आलेल्या भरती मुळे नदी पाञातल पाणी आता गावात शिरायला सुरूवात झाली होती… आणि बघता बघता साविञी नदि ने धोक्याची पातळी ओलांडली.. महाड बाजारपेठ आणि सखोल भागात पाणी शिरल सगळी कडे पुर सद्रुश्य परिस्थिति निर्माण झाली होती…
आशा ह्या भयान दिवशी आभाळीचा गोळा डोंगराड गेला तो पावसा समोर हार मानुन.. राञी गावात पाणी शिरल्या मुळे विजपुरवठा खंडित झाला होता.. सगळी कडे भयान अंधार आणि पाण्याचा आवाज पावसाला चिरत वाहणारा वारा दारा खिडक्यांचा आवाज करत शांतता भंग करत होता अशात राञीचा अंधारात महाड जाग होत… दिवसाच्या मशक्कत नंतर राञी अखेर दमुन हतबळ झालेले महाडकर झोपी गेले आणि पावसाच्या माराला नदी उत्तर देत वाहत होती..

                                     आषाढ़ वद्य आमावस्या राञी ११:३० च्या दरम्यान महाड नजिक असलेल्या राजेवाडी गावा जवळ असलेला सुमारे १०० वर्षांहुन आधीचा दगडी पुल त्या साविञी नदित पाय रोवुन खडा होता पावसाचा मार, वार्याचा ताण आणि नदिचा घाव ह्या मुळे पुल थकत चाला होता… त्या राञी सावित्री जणु चैथाळली होती, तीच ते भयान रूप, फेसळणार पाणी आणि सावित्री चा तांडव त्या नदि पाञात कायम होता.. साविञी च्या रौद्र रूपाला आता थांबवण अशक्य होत आणि एवढ्यातच घात झाला सावित्री च्या प्रकोपाला तो १०० वर्ष जुना पुल अखेर नमता झाला विझली त्याची शक्ति आणि तो पुल बघता बघता त्या साविञी च्या पोटात गुडुप झाला पण नुसता पुलच नाही तर एका एस. टी. बस ला आपल्या सोबत घेउन अविरत उभा असलेला हा सावित्री पुल अखेर त्या बस ला आपल्या मिठीत घेऊन त्या रौद्र सावित्री च्या गभ्यात हरवला.. त्या बस मधुन बाहेर येणाऱ्या किंचाळ्या आसमंत चिरत थेट आनंतात विलीन होत होत्या पण त्यांचा हाकेला ओ देणार कोणी च तिथ येणार नव्हत.. त्या नदित वाहुन गेली कित्येक निष्पाप आयुष्य, कित्येक केविळवाणे जिव कोणाचे तरी मम्मी, पप्पा, आई बाबा, आत्या मावशी, मामी मामा काका आणि बहीन भाऊ सुध्दा कित्येकांचे कुटुंब ह्या पाण्याचा झोतात वाहुन गेली ती कधी किनार्यावर न येण्यासाठीच.. पहील्या गाडीचा अपघात झाला.. त्या मागे रस्ता कापत पळणारी दूसरी एस. टी. बस त्याच वाटेवर धावत होती पण दुर्दैव आमच की त्या बस ला सुद्धा वाचवणार कोणी नव्हत ह्या निसर्गांचा अतिरेकाला उगाच निष्पाप बळी पडलेल्या त्या जिवांचा कंठ फुटे पर्यंतर फुटणारा टाहो त्या देवाला सुद्धा रडवेल एवढ भयान राती त्या साविञी ने त्या वहानांना आपल्यात विलीन करून घेतल काही वेळा नंतर एक चार चाकी तवेरा गाडी सुध्दा तिच पुनरावृत्ती करत त्या नदिचा प्रवाहात दम तोडत होती..

वेगवेगळ्या जागे वरूण सुरू झालेला ह्या निष्पापांचा प्रवास अखेर ह्या नदिचा प्रवाहात संपुष्टात गेला कोणी तरी गाडी च्या काचा फोडुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तर कोणी आपला श्वास रोखुन वर येण्याच प्रयत्न करत होता.. गाडीचा अपघात आणि त्या मुळे लागलेला जबर मार ह्या मुळे रक्ताचा उठलेला तवंग पाण्याचा झोतात कधी विरुन गेला कळालच नाही बचावासठी काही गाडी बाहेर पडले तर काहींनी तिथेच आपला शेवटचा श्वास सोडला कोणी पाण्याचा प्रवाहात वाहत होत वाचवण्यासाठी कंठ फोडत होत पण वाचवणार कोणीच नव्हत कोणाला कळण्या आधीच होत्याच नव्हत झाल…
निसर्गांचा प्रकोपासमोर सगळे हतबळ झाले आणि जिवंत बाहेर पडण्यासाठीचे दरवाजे हळू हळू बंद होत होते… तिकडे पुलावर यमाला आणि मृत्यु ला पुलावरच रोखुन तिथे पुला जवळ काम करणारा एक तरूण पुढे सरसावला त्याला परिस्थिति च गांभिर्य लक्षात घेऊन मृत्यु चा वाटेवर चालणार्या आणखी एका एस टी बस आणि गाड्यांना रोखुन धरल.. मृत्युला मात देत देवदूत ठरलेल्या त्या तरूणा मुळे कित्येक लोकांना जलसमाधी पासुन वाचवल आणि त्यानी थेट पोलिस यंञणेला फोन केला काही कारणास्तव पहिला फोन लागला नाही नंतर त्यानी आपल्या मालकाला फोन करुन सदर घटनेची माहीती दिली हिकडे पावसाचा प्रकोप सुरूच होता.. निरव शांततेत पाण्याचा खळखळणारा आवाज भयानकतेची जाणिव करूण देत होता काही वेळाणे पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंञणा घटना स्थळी दाखल झाल्या… राञ भर पावसात भिजत यंञणा त्याठीकाणी पाहारा ठेवुन होती
थोड्याच वेळात सकाळ झाली आणि आशेच किरण घेउन सुर्य आसमानाच्या चैकटीत आला..
सकाळ झाली तेव्हा वास्तव किती भयानक होत त्याची जाणिव झाली..
सकाळी स्थानिक बचाव दल, एन. डी. आर. एफ चे जवान, नेवी आणि कोस्टगार्ड चे कर्मचारी बचाव कार्यासाठी नदी पाञात उतरले.. काही वेळाणे नेवी चे २ आणि कोस्टगार्ड चे २ अशे ४ हॅलिकाॅप्टर घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्याला युद्ध पातळीवर सुरूवात झाली तासांमागुन तास उलटत होते पण कसलाच सुगावा लागत नव्हता अखेर हाती काहीच न लागता पहील्या दिवसाचा अंत झाला.. २ दिवस सकाळी डोळे उघडण्याच्या आधिच बचाव कार्याला पहील यश आल आंजर्ले समुद्र किनार्या वर पहीला मृत देह सापडला… काही वेळाणे दुसरा मृतदेह हरेहरेश्वर ला सापडला एक एक करुन मृत देह किनार्या वर येत होते दिवसा मागुन दिवस लोटत होते आणि कोणी जिवंत असण्याची शक्यता धुसर होत होती..
सगळी कडे बचाव कार्य सुरू होत.. News चॅनेल वर सगळी कडे झालेल्या प्रकाराच live कवरेज सुरू होत सगळ्या टीव्ही चॅनल वर प्रकर्शाने महाड, सावित्री नदी आणि तो सावित्री पुल झळकत होते.. जगाचा नकाशावर महाड पराक्रमाची साक्ष देत उभा होताच पण ही घटना आणि त्या मुळे महाड ला मिळालेली प्रसिद्धी नको होती.. अखेर ९ दिवसा नंतर एस. टी बस चा सांगाडा नेवी च्या जवानांना मिळाला… ९ दिवस अविरत आणि अथक परिश्रमां नंतर अखेर सुगावा लागला आणि पहिली एस टी बस मिळाली आणि आणखी काही गांड्यांचे अवशेष पाण्या खाली असल्याचा अंदाज नेवी च्या जवानांनी वर्तवला ह्या कार्यात नेवी आणि कोस्टगार्ड चे जवान शामिल होतेच पण स्थानिक रहवासी सुध्दा बचाव कार्यासाठी जिव ओतुन काम करत होते…

                                        बघता बघता १० दिवस उजाडला दिवस भराच्या अथक प्रयत्नां नंतर अखेर दिवसा आड काही आत्याधुनीक विजेरी च्या साह्याने दुसर्‍या एस टी बस ला सुध्दा जमीनी वर काढण्यात आल… दिवस ११ जवानांनी नदी पाञात हरवलेली तीसरी तवेरा गाडी पाण्या खाली असण्याचा दावा केला आणि नुसता दावाच नाही तर त्या गाडी ला सुध्दा यशस्वी रीत्या बाहेर काढण्यात आल… पण त्या गाडी मध्ये अजुन ही काही मृत देह तसेच अडकले होते त्यांना सुध्दा बाहेर काढुन आपल्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल… एकी कडे कोणीतरी जिवाची बाजी लावुन दिवस राञ पाण्यात त्या नावेवर मान टाकुन काम करत होती तळमळत होती आणि एकी कडे हिकडे आरोप प्रत्यारोप करत एकमेकांवर चिखलफेक करीत होते कोणी आपल्या नातेवाईकांकडे आशेची नजर लावुन त्या नदिपाञाच्या किनारी ऊनपावलाची तमा न बाळगता आसव मोजीत होती तर कोणी पिकनिक स्पॉट असल्यासारख सेल्फी काढत होते…
पुल जुना झाला म्हणुन कोणीतरी साता समुद्रा पालिकडुन पञ लिहुन आपल्या कर्तव्यदक्षतेची पावती देत होत तर कोणी तरी पुलांवरून २० टनाच वाहन चालवुन पुलाची चाचणी केल्याचा दावा करीत होते… महाड दुर्घटना झाली म्हणून खडखडुन जाग झालेल सरकार राज्यातल्या सर्व पुलांचे आॅडीट करण्याचा दावा करतात तर दुसरी कडे निश्पाप बळी पडलेल्या त्या प्रत्येक नातेवाईक देवाला पाण्यात ठेवून जाब विचारत आहेत… ह्याला जवाबदार कोण… अंग्रेजांनी बांधलेल्या पुलांचे कौतुक देखील फार झाले कारण त्या पुलांनी १५० वर्ष पार झाले पण आज ३५० वर्षा नंतर ही पुण्यश्लेक छञपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड नजीक पार ह्या गावी बांधलेला दगडी पुलाची दखल माञ कोणी घ्यायला तयार नाही अरे आज ३५० वर्षा नंतर देखील सुस्थितीत असणारा हा पुल आपल्या बनावटीची साक्ष देत उभा आहे.. दुरदैंव आमच की ह्या घटनेला बळी पडलेल्या त्या निष्पाप नातेवाईकांच्या मनात आणि कित्येक जनमानसांच्या मनात पेटलेल्या आगीवर फुंकर मारण्याच काम प्रशासनान उत्तम केल पण ह्या सर्वांना खरा न्याय तेव्हा च मिळेल जेव्हा आशि घटना ह्या महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही कारण थेंब चाटुन तहाण भागत नाही प्रशासनान अश्वासनांच्या पलिकडे जावुन काही तरी ठोस पाऊल उचलण गरजेच आहे नाही तर दफ्तरांच्या रांगेत लाल कापडात बांधुन ही घटना सुध्दा धुळखात पडुन राहील आणि मारेकरी माञ मेकाटच….
त्या नदी किनारी फिरताना आज वाहणारा संत शांत प्रवाह त्या राञी एवढा प्रचंड तांडव का करीत होता ते कळण अवघड आहे.. ज्यांचे मृत देह सापडले ते त्यांचा नातेवाईकांकडे पोच झाले पण जे सापडले नाहीत त्यांचा नातेवाईकांनी नदीच्या पाण्यात फुल हार सोडून कधीही न परतणार्या आपल्या जिवलगांना शेवटचा निरोप दिला…

खरच त्या राञी उतव आला उतव..
#एक_होता_पुल

©-उनाड… 👣 💭 (सिध्देश भाई सुर्वे)

ज्वलंत रायगड अनुभव… 🚩🙏

 

रायगड महाराष्ट्राचा भुमीवर डौलात आपल्या ईतिहासाची आणि कर्तृत्वाची साक्ष देत उभा असणारा एक दुर्गपुरूष..  अशाच प्रत्येक हिंदुच्या आणि मराठ्याचा पावन भुमिवर दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शाक्त पद्धतिच ३ रा राज्याभिषेक सोहळा करण्याचा काही संघटनांचा मानस आहे अस काना वर आल..  ३ रा राज्याभिषेक म्हणजे नक्की आहे तरी काय आणि हे लोक करणार तरी काय हे बघण्या साठी आणि जर रायगडाच पाविञ्य धोक्यात येणार असेल तर आपण शांततेच्या मार्गान त्याचा निषेध कराव आणि काही बिग्रेडी संघटना रायगडावर एक कार्यक्रम करून हिंदु मुस्लिम एकतेच्या नावा खाली काही चुकीच्या गोष्टीला वाव देत असतील तर त्याला कुठे तरी निषेध दर्षवण्या साठी आम्ही काही जण मागचे काही दिवस झटत होतो आणि दिवस आला आखेर २३ सप्टेंबर २०१६  आम्ही येतो येतो अस म्हणून शिवाजी महाराजांचा नावाचा खाली शिवभक्ती चे गाण गाणारी ही मंडळी कामाच्या वेळी कारणांचा पाऊस पाडुन घरी बसली पण समोर यवन दिसताना शांत बसतिल ते मराठे कुठले म्हणून जे आले त्यांचा सोबत आणि जे नाही आले त्यांचा शिवाय महाड हुन आम्ही ७ मराठे रायगडाकडे कुच करायला पुढे सरसावलो..

काळ्याभोर आसमंतात चकाकणारी एका क्षणात लक्ख करुन टाकणारी विज आणि आपल्या संपुर्ण ताकदिनीशी तुटुन पडलेला पावुस आम्हा मराठ्यांची परीक्षा घेत होता..

पण आता केलय यल्गार मग माघार कसली आन शिवाजी महाराजांचा जयघोषात आम्ही रायगडाच्या वाटेवर दौडु लागलो..  चकाकणारी विज पडली काळजात आणि पेटला मराठा सरसावला पुढे आणि रायगडाच्या पायथ्यावर येवुन थांबलो..  रायगडाच ऐश्वर्य नजरेत साठवल आणि गड चढाई ला प्रारंभ केला..  किल्ल्याला छावणी च स्वरुप आलेल आणि आम्ही किल्ल्यावर पोहचलो..

काही स्थानिकांनी, स्थानिक आमदारांनीआमच्या राहण्याची सोय झेड पी च्या २ नं खोली मध्ये केली होती भर पावसात दातांचा नगारा वाजवत आम्ही आखेर मुक्कामा पर्यंतर पोहचलो..  गोष्ट ईथे थांबली नाही आमच्या साथीला आणखी काही मराठे महाराष्ट्राचा कानकोपर्यातुन रायगडाकड कुच करायला सरसावले होते प्रत्येका जवळ संपर्क केला माहीती दिली आणि आनलेली शिदोरी खाऊन घेतली..

राञी ३ः३० च्या सुमारास दारावर खडखड झाली डोळा हटला दार उघडल दारात होते सातारा  फलटण आणि मुंबई हुन आलेले १०/१२ धारकरी भर पावसात कशाची पर्वा न करता राञी १/२ वाजता हे पठ्ठे गड चढुन आले होते सर्वांना आत घेतल..  आणि विश्रांती साठी आम्ही जमीनीवर पालथे झालो..  स्वराज्याचा स्वप्नात हरवलोच होतो की एवढ्यात दारा वर पुन्हा हरकत झाली दार उघडल पण आता दारात उभे होते पोलीस साहेब आणि काही वरिष्ठ मंडळी आमच्या संपुर्ण खोलीला पोलीसांनी हेरल होत पोलिस आत आले प्रत्येकाची चौकशी उलट तपासणी झाली सामानाची तपासणी झाली साहेबांना वाटल की आम्ही लपुन वार करायला आलो आहोत..  आहो पण मागुन वार करतील ते मराठे कसले अररर..  सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दात हि आमची आवकात सांगणारे मराठे आहेत पाठुन वार करायची नियत आमची नाही..  झडती झाली आमच नाव पत्ता लिहुन घेतल आणि आम्हाला तिथेच नजरकैदेत ठेवुन खोलीला बंद करण्यात आल आमच्या जवळील मोबाइल आन काही गोष्टी काढुन घेतल्या आन ह्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत ह्या माझ्या रायगडावर आम्हा मराठ्यांना बंद करून नजरकैद करण्यात आल पण काही मावळे आडकले म्हणून स्वराज्याच सुराज्य व्हायच थांबतय व्हय..  आम्ही तिथ बसुन हिंदु धर्मा चा जय जयकार करत होतो आन अजुन शे दोनशे मावळे रायगड सर करत होते..  आमचे काही मावळे गडा वर पोहचले आन त्या बिग्रेड्यां पेक्षा आमच्या धारकर्यांनीच गड खुलुन आला व्हता..  आम्ही सकाळी ६/६ः३० ते दुपारी १/१ः३० पर्यंतर बंदिवासात होतो आखेर काही प्रतिष्ठांचे धारकरी आले आणि  आम्हाला मुक्त केल आम्ही पुढे आलो पाहील बघतो तर काय हा २००/३०० जणांचा समुहा आम्हाला आझाद करायला समोर सरसावल होत आम्ही एकञ भेटताच आसमंत चिरत एकच आरोळी गगनाला भिडली पुण्यश्लोक छञपती शिवजी महाराज की जय..

आर काय तो क्षण डोळे पाण्यान भरून आले जणु राज औरंग्याचा नजर कैदेतुन सुखरुप सुटल्यावर काय जश्न झाला असेल त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला आमच्या धारकर्यांनी आमच्या गैरहाजेरीत आपल काम चोख केल आणि आमच्या बंदिवासाच खर्या अर्थाने सार्थक झाल पोलिस साहेबांन सोबत राज सदरेत जावुन तिन हात मुजरे झाडले आन त्या बिग्रेड्यांकड पाठकरत आम्ही आमच्या वाटेवर परते झालो..  शेवटी जाता एकच वाटत कि आमच्याच वाटेवर येवुन, आमच्याशीच वाटमारी करणार्या चा वाटे वर जावुन वाट लावल्या शिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा ईतिहास आमचा पण ह्या बाठलेल्या बिग्रेड्यांना मराठ्यांचा ईतिहास काय कळणार असो..  पण आयुष्य भरासाठी रायगडाने दिलेला अनुभव आजन्म माझ्या स्मरणात राहील..

पुण्यश्लोक छञपती शिवजी महाराज की जय..
धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय..
भारत माता की जय..
हिंदूधर्म की जय..
गो माता की जय…

 

 

-उनाड.. 👣 💭